* विभागात 88 ठिकाणी क्वॉरंटाईन सुविधा
* विभागात 12 हजार 850 बेड्स उपलब्ध
* 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा
* 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण तर 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी
* शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मे.टन धान्यसाठा उपलब्ध
पुणे : पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 104 झाली असून पुणे जिल्ह्यात- 74, सातारा- 3 सांगली- 25 आणि कोल्हापूर जिल्हयात 2 रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 2 हजार 265 होते. त्यापैकी 2 हजार 58 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 207 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 915 नमुने निगेटीव्ह आहेत व 104 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 19 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागामधील 8 हजार 615 प्रवाशांपैकी 3 हजार 977 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 4 हजार 638 प्रवाशांबाबत पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 542 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
विभागामध्ये सद्यस्थितीत एकुण 88 ठिकाणी कॉरंटाईन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 12 हजार 850 बेड्स उपलब्ध आहेत. तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकुण 2 हजार 167 बेड्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विभागामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकुण N95 मास्क -53 हजार 640, ट्रीपल लेअर मास्क -2 लाख 64 हजार 429 उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 581-पीपीई कीट, 13 हजार 106- हॅण्ड सॅनिटायझर (500 मिली.), 4 हजार 539- व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात 137- व्हेंटीलेटरर्स तर खाजगी रुग्णालयात 1 हजार 328 व्हेंटीलेटरर्स उपलब्ध आहेत.
विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा
पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागात अंत्योदय (AAY)व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिकाधारक कुटुंबापैकी आतापर्यंत 9 लाख 4 हजार 604 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळाचे 2 लाख 18 हजार 621.45 क्विंटल धान्य वितरण करण्यात आले आहे.
मार्केट मध्ये विभागात अंदाजे एकूण 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक झाली असून भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 9 हजार 168 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात दि.3 एप्रिल 2020 रोजी 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
विभागात स्थलांतरीत मजूरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 109 व साखर कारखान्यांमार्फत 562 असे एकुण 671 रीलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 62 हजार 736 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 17 हजार 16 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, अशीही माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली आहे.