नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळातही वर्ध्यातल्या आर्वी इथले आमदार दादाराव केचे यांनी आयोजित केलेला नागरिकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पोलीसांनी कारवाई करून बंद पाडला.

आमदार केचे यांनी वाढदिवसानिमीत्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र धान्य वाटपादरम्यान गर्दी होऊ नये यादृष्टीनं सुरक्षाविषयक कोणतीही खबरदारी या कार्यक्रमादरम्यान घेतली गेली नव्हती, त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती अशी माहिती पोलीसांनी दिली.

यानंतर आमदार केचे यांचं घरही लॉकडाऊन केलं असल्याचं पोलीसांनी सांगितलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केचे यांनी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती असं आर्वी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी स्पष्ट केलं आहे. या आयोजनाविषयी चौकशी अहवाल तयार केल्यानंतर कारवाईचा विचार केला जाईल असंही धार्मिक यांनी म्हटलं आहे.