मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी केलेल्या आवाहनानुसार  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा व इतर सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणावर झटत आहेत.

विशेषतः लॉकडाऊनच्या  काळात गोरगरीब, असंघटित कामगार, गरजू  यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे आज भारतीय नौदलामार्फत मुसाफिरखाना भागातील गरजूंना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या  प्रयत्नाने जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप करण्यात आले.

यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, उपजिल्हाधिकारी श्रीमती फरोग मुकादम व इतर अधिकारी उपस्थित होते.