नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असूनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय, असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे.

नवी मुंबईतली वाशी इथली बाजार समिती आणि पुणे, ही आंब्याची मुख्य बाजारपेठ असते. या दोन्ही ठिकाणांहून व्यापाऱ्यांनी ग्राहकच नसल्यानं आंबा पाठवू नका, असं बागायतदारांना कळवलं आहे
यावर्षी आंब्याचं पीक कमी असल्यानं हंगामाच्या सुरवातीला एका आंब्याला अगदी चारशे रुपयांची किंमत मिळत होती. मात्र ग्राहकांच्या अभावी आता हीच किंमत तीस रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत घसरली आहे.
पणन मंडळाच्या प्रयत्नांमधून वाशीच्या बाजार समितीमधून अरब अमिराती आणि ओमानला नुकतीच शंभर टन आंब्याची निर्यात झाली आहे.