नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय उद्यानं, व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यामध्ये covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यं तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश दिले आहेत. अमेरिकेतल्या एका वाघाला covid-19 ची लागण झाल्याच्या वृत्तानंतर पर्यावरण मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यात माणसांचा वावर कमी करणं तसंच माणसापासून वन्यप्राण्यांना किंवा प्राण्यांपासून माणसांना संसर्ग होऊ नये यासाठी अभयारण्यातले कर्मचारी आणि पशू चिकित्सक यांचं पथक स्थापन करण्यास मंत्रालयानं सांगितलं आहे.