नवी दिल्ली : सीएसआयआर- राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे येथील परवानाधारक स्वामित्व तंत्रज्ञानावर आधारित जेन्रीच मेम्ब्रनेस या कंपनीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी विकसित केलेल्या मेम्ब्रने ऑक्सिजेनेटर उपकरणे (एमओई) तयार करण्यासाठी वित्त सहाय्य देत आहे. नाविन्यपूर्ण, स्वदेशी हॉलो फायबर मेम्ब्रने तंत्रज्ञान, दबावाखाली (4-7 बार, तेल मुक्त कॉम्प्रेसर वापरुन) हवेमध्ये 35% पर्यंत समृद्ध ऑक्सिजन पुरवठा करते.
उपकरणांमध्ये मेम्ब्रने कार्टरेज, तेल मुक्त कॉम्प्रेसर, आउटपुट फ्लो मीटर, ह्युमिडीफायर बाटली, नासल-कॅन्युला आणि ट्यूबिंग आणि फिटिंग्ज असतात. मेम्ब्रने कार्टरेज, ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगळे करण्यास सक्षम असून जीवाणू, विषाणू आणि इतर कणांना प्रतिबंध करतो. निर्माण होणारी हवा वैद्यकीय श्रेणीची आहे.
हे उपकरण सुरक्षित आहे, त्याच्या क्रीयान्वयनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता नाही, किमान देखभाल आवश्यक आहे, पोर्टेबल आहे, सुटसुटीत आहे आणि साइटवर प्लग-अँड-प्ले सुविधा, जलद ऑक्सिजन-समृद्ध हवा प्रदान करते.