नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. कोविड१९ विरोधातल्या लढ्याची पुढची दिशा काय असावी यावर या बैठकीत वैचारविनिमय झाला.

देशभरात सध्या कोरोनापासून बचावासाठी लागू असलेल्या टाळेबंदीला १४ एप्रिलनंतर मुदवाढ द्यावी की नाही याबाबत मोदी सर्व मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेतलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची आणि उपाययोजनांची माहिती या बैठकीदरम्यान मोदी यांना दिली.