नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयानं खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना जारी केल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या मलाची ने-आण करण्यासाठी विशेष योजनाही मंत्रालयानं तयार केली आहे. शेतकरी, सहकारी संस्था यांना थेट शेतमाल खरेदी करण्याचे निर्देश  दिले आहेत.
घाऊक स्वरूपात हा माल घ्यायला सांगितलं आहे. फळ आणि भाजीपाला बाजार तसंच कृषी उत्पादनांच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी  आतापर्यंत 7 लाख 76 हजार मालवाहू ट्रक, आणि 1 लाख 92 हजार वाहतूकदारांची नोंद झाली आहे.  रेल्वेनं मालवाहतूकीसाठी नवे 62 मार्ग सुरु केले असून त्यावर 109  पार्सल ट्रेन्स धावत आहेत.