मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षकांनी हवेली येथील हातभट्टीवरील दारू विक्रीसाठी पुणे शहर व परिसरात नेताना जप्त केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काल केलेल्या कारवाईत वाहनावरती ‘अत्यावश्यक सेवा’ असा बोर्ड लावत असलेले दोन बोलेरो पिक अप जप्त करण्यात आले. यामध्ये 2500 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने हातभट्टी दारूनिर्मिती ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 41 हजार लीटर हातभट्टी निर्मितीचे रसायन मिळून आले ते रसायन दोन JCB चे साहाय्याने नष्ट केले. लॉक डाऊन कालावधीत सर्व दारू दुकाने बंद असल्याने हातभट्टीची दारु मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. सदर सोरतापवाडी ठिकाणावरून पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.