मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात राज्यातल्या शाळांनी शुल्कासाठी तगादा लावला, तर पालक, अशा शाळांविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

संचारबंदी ३ मे पर्यंत वाढल्यानंतरही, अनेक शाळा पालकांकडे शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळांनी पालकांकडे शुल्काबाबतची मागणी करू नये याबाबतचे निर्देश ३० मार्चलाच जारी केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतर शुल्काची मागणी केली जाऊ शकते, असं या निर्देशांत नमूद असल्याचं त्या म्हणाल्या.