पुणे : कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय भेगडे हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
बुधवार दि. 3 जुलै 2019 रोजी सकाळी 9.45 वा. तळेगाव दाभाडे येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आगमन. सकाळी 10.30 वा कोंढवा पुणे व आंबेगाव बुद्रुक येथील दुर्घटनेबाबत आढावा बैठकीस उपस्थित. सकाळी 11.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथून पणन हाऊस गुलटेकडीकडे प्रयाण. दुपारी 12 वा. पणन हाऊस गुलटेकडी आगमन व सोमाठणे तळेगाव रस्त्याबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वा. पणन हाऊस, गुलटेकडी येथून नवीन विश्रामगृह पुणे कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा नवीन विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. नवीन विश्रामगृह येथील विविध बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 4 वा. पर्यावरण विभागाची पुणे जिल्हा आढावा बैठक (स्थळ: नवीन विश्रामगृह, पुणे) सायंकाळी 5 वा. कामगार विभागाची पुणे जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ: नवीन विश्रागृह, पुणे) बैठकीनंतर विश्वकमल बंगला तळेगाव दाभाडेकडे प्रयाण, आगमन व राखीव.
गुरुवार दि.4 जुलै 2019 ते रविवार दि. 7 जुलै 2019 पर्यंत मावळ मतदारसंघातील विविध गावात दौरा. सोमवार दि. 8 जुलै 2019 रोजी सकाळी 7.00 वा मुंबईकडे प्रयाण.