नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशात आज राज्यपाल लालजी टंडन यांनी एका छोटेखानी समारोहात पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

नरोत्तम मिश्रा, तुलसी सिलावत, कमल पटेल, गोविंद सिंग राजपूत आणि मीना सिंह यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

या समारोहात सामाजिक सुरक्षित अंतर नियमाचं काटेकोर पालन करण्यात आलं. मध्य प्रदेशात २३ मार्चला शिवराजसिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हापासून ते एकटेच कारभार सांभाळत होते.