पुणे : राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या  कार्यालया अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड) कडून दि. 22, 23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोरोना (कोविड 19) महामारीमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. असे जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्डाचे  सचिव तथा राज्य शासनाच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक (परीक्षा  प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी  प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.