नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात सुरू असणाऱ्या कारखान्यात एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तर कारखाना मालकाला अटक करण्याचे कोणतेही निर्देश सरकारनं दिलेले नाहीत. केंद्र सरकारनं हे स्पष्ट केलं आहे. अशा बातम्या निव्वळ अफवा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे नियम पाळणे यासारख्या उपाययोजना राबवून कारखान्यांनी उत्पादन सुरू करावे असंही जावडेकर म्हणाले.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. देश कोरोनाविरुद्ध लढा देत असताना काँग्रेस मात्र नकारात्मक राजकारण करत सरकारसमोर अडचणी निर्माण करत आहे, असं ते म्हणाले.