पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवसापासून बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप करण्यात येत आहे. या मध्ये जीवन आवश्यक वस्तू जसे की, तांदूळ, गहू, साखर, डाळ, तेल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चालू असल्याचे बिहार फौंडेशन व पुर्वांचल विकास मंचाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वरील कार्यामध्ये बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांचे कार्यकर्ते शशिकांत पासवान, नेताजी सिंह व सुनील कुमार यांनी सहभाग घेऊन, गरजवंताला शिधा मिळेल याची काळजी घेतली.