नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूनं आतापर्यंत जगभरात दोन लाखाहून जास्त बळी घेतले असून  असून २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आतापर्यंत  जगात २१० देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला आहे. पाच देशांमध्ये प्रत्येकी २० हजारापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले असून अमेरिका, इटली आणि स्पेन या देशांमध्ये कोरोनामुळे  सर्वात जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत.