नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २  हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. एक-दोन दिवसात या बस जाणार आहेत.

या बसगाड्या धुळ्याहून रवाना होतील आणि परत धुळ्यालाच येतील. तिथून विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येईल. घरी परतलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांना सोबत आणणाऱ्या पालकांची वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यांना घरी 14 दिवसांसाठी सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येईल, असं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.