भारतासह 30 देशांनी पहिल्या आभासी पीटर्सबर्ग हवामान संवादातील हवामानबदलाच्या मुद्यांवर केली चर्चा
नवी दिल्ली : पीटर्सबर्ग हवामान संवादाच्या 11 व्या सत्रात भारतासह 30 देशांनी कोविड-19 नंतर आमची कार्यक्षमता वाढवून आणि हवामानातील कृती वृद्धिंगत करत तसेच विशेषत: सर्वात असुरक्षित घटकांना पाठबळ देत आपण आपली अर्थव्यवस्था आणि समाज पुनरुज्जीवित करण्याच्या आव्हानाला कसे एकत्रितपणे सामोरे जाऊ शकतो यावर विचारविनिमय केला.
पहिल्या आभासी पीटर्सबर्ग हवामान संवादामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, “आज ज्याप्रमाणे संपूर्ण जग एकत्रितपणे नवीन कोरोना विषाणू साठी लस शोधण्यामध्ये व्यस्त आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे खुले स्रोत म्हणून पर्यावरण तंत्रज्ञान असले पाहिजे जे परवडणार्या किंमतीवर उपलब्ध असावे ज्याची जगाला गरज आहे .”
हवामान अर्थव्यवस्थेवर जोर देत जावडेकर म्हणाले की, .“आपण विकसनशील जगाला तत्काळ 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स अनुदान देण्याची योजना आखली पाहिजे,”
कोविड-19 साथीच्या आजारावर मात करण्यासाठी संपूर्ण जगाची एकतेची भावना व्यक्त करतांना केंद्रीय मंत्र्यांनी कोविड-19 ने आपल्याला कमी साधनसामग्रीमध्ये देखील मानव जगू शकतो हे शिकवले आहे हे अधोरेखित केले. शाश्वत जीवनशैलीच्या गरजेनुसार जगाने अधिकाधिक शाश्वत उपभोग पद्धतींचा अवलंब करण्याचा विचार केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पॅरिसच्या सीओपी दरम्यान सांगितले होते; पर्यावरण मंत्री यांनी यावेळी याचा पुनरुच्चार केला.
त्यांनी नमूद केले की दहा वर्षांच्या कालावधीसाठी भारताने निर्धारित केलेले राष्ट्रीय योगदान महत्वाकांक्षी असून ते पॅरिस कराराच्या तापमान लक्ष्याच्या अनुरुप आहेत. मंत्री यावेळी नवीकरणीय ऊर्जा उपयोजनाला गती देण्यासाठी आणि अक्षय ऊर्जा व उर्जा कार्यक्षमता क्षेत्रात नवीन हरित रोजगार निर्माण करण्याच्या संधींविषयी देखील बोलले .
पहिला आभासी हवामान संवाद हे पीटर्सबर्ग हवामान संवादाचे अकरावे सत्र होते जे आंतरराष्ट्रीय हवामान वाटाघाटी आणि हवामान कृतीची प्रगती या दोहोंवर लक्ष केंद्रित करणार्या, एक अनौपचारिक उच्च-स्तरीय राजकीय चर्चेसाठी मंच प्रदान व्हावा यासाठी जर्मनीतर्फे 2010 पासून याचे आयोजन केले जात आहे. आभासी XI पीटर्सबर्ग हवामान संवाद जर्मनी आणि ब्रिटन यांच्या सह अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, हे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (यूएनएफसीसीसी) च्या 26 व्या परिषदेचे (सीओपी 26) आगामी अध्यक्ष असतील. या चर्चेत सुमारे 30 देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींचा सहभाग होता.
या वर्षीची चर्चा महत्वपूर्ण टप्प्यावर आली जेव्हा लोकांचे जीव वाचवताना, महामारीमुळे उद्भवलेल्या सामाजिक आणि आर्थिक संकटांवर मात करत कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेली संपूर्ण परिस्थिती हाताळत असतानाच, सर्व देशांनी 2020 नंतर युएनएफसीसीसी अंतर्गत पॅरिस कराराच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात जाण्याची तयारी देखील दर्शविली. कोविड-19 नंतर आमची लवचिकता वाढवून आणि हवामानातील कृती वृद्धिगत करत तसेच विशेषत: सर्वात असुरक्षित घटकांना पाठबळ देत आपण आपली अर्थव्यवस्था आणि समाज पुनरुज्जीवित करण्याच्या आव्हानाला कसे एकत्रितपणे सामोरे जाऊ शकतो याविषयी विचारविनिमय करणे हा मुख्य विषय होता.
केंद्रीय मंत्र्यांनी जर्मनीच्या पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि विभक्त सुरक्षा मंत्रालयाच्या मंत्री स्वेंजा शुल्झे यांच्यासमवेत भारत जर्मन द्विपक्षीय बैठकीत भाग घेतला. पीटरसबर्ग हवामान संवादाच्या अगदी आधी ही द्विपक्षीय बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यामध्ये हवामान बदल, जैवविविधतेचे संरक्षण आणि जर्मनीबरोबर तांत्रिक सहकार्य या सारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविड-19 साथीच्या आजारामुळे उभय देशात उद्भवलेली परिस्थितीत आणि रोगमुक्ततेसाठी करत असलेल्या प्रयत्नांवर देखील यावेळी चर्चा झाली.