नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोनवेळा महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या चंद्रहार पाटील यांनी विटा इथल्या तहसिलदाराना मारहाण केली आहे.
चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या तहसिलदारांनी जप्त केल्या होत्या आणि साडेसात लाखांचा दंड ठोठावला होता. हा दंड कमी करण्याची मागणी चंद्रहार पाटील अनेक दिवसांपासून करत होते. मात्र तहसीलदारांनी पूर्ण दंड भरण्याची सूचना केली होती. या रागातून चंद्रहार पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात तहसिलदारांना मारहाण केली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.