नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले आहेत. ३ जून ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुरस्कारांची निवड प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होते.

यंदा लॉकडाऊनमुळे अर्जाची मूळ प्रत पाठविण्याची गरज नाही. अर्जदारांनी सही करून आणि शिफारशीसह हे अर्ज इमेल वर पाठवावे असं क्रीडा मंत्रालयानं सांगितलं आहे.