नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून हा निधी दिला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एकूण ३१४ कोटी रुपये जमा झाले आहेत.