नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं देशभरात २३ राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशातल्या २१५ रेल्वेस्थानकांवर विलगीकरण कक्षात रुपांतरीत केलेल्या रेल्वेगाड्या तयार ठेवायचा निर्णय घेतला आहे.

कोविड- १९ च्या उपचारांसाठी खाटा आणि इतर साधनसामग्रीने या रेल्वेगाड्यांचे डबे सुसज्ज असतील. यातल्या ८५ स्थानकांवर आरोग्य कर्मचारीही तैनात असणार आहेत.

राज्यातल्या २१ स्थानकांवर या गाड्या उभ्या राहणार आहेत. त्यात सोलापूर, पुणे, भुसावळ, नागपूर, मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, इगतपुरी, नांदेड, दौंड, पनवेल, मिरज, पंढरपूर, बल्हारशाह , दादर, लातूर, शिर्डी , औरंगाबाद गोंदिया, इतवारी, नागबीळ आणि नंदुरबार या स्थानकांचा समावेश आहे.