नवी दिल्ली : देशातील बँका यापुढे एटीएमप्रमाणे काम करू लागतील. म्हणजेच खातेधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे शक्य होईल. व्यवहारासाठी त्यांना आपल्या शाखेत जावे लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांशी बोलणी सुरू आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सांगितले.
देशात मोठ्या दोन-तीन निवडक बँकाच राहाव्यात, यासाठी सरकार आग्रही आहे. त्यामुळे लागणारे तंत्रज्ञानही गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.