नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रत्नागिरीत आज एकाच दिवशी चार करोनाबधित रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातल्या एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेला करोनाची लागण झाली असून इतर तिघे मुंबईतून आलेले आहेत.
आज रत्नागिरीत दोन तर खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता २१ झाली असून १५ रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरूआहेत. तर पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत.