नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
आजपासून लालबागमधे औषधं आणि वैद्यकीय साहित्याची दुकानं वगळता सर्व दुकानं आणि आस्थापनं बंद राहतील.