पुणे : पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 926 बाधीत रुग्ण असून 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हयातील 119 कोरोना बाधीत रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 264 कोरोना बाधीत रुग्ण असून 41 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 हजार 64 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32 हजार 366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 671 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 28 हजार 969 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण :
दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : –
दि. 11.05.2020 रोजी दु. 4.00 वा. पर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 4, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1 अशा एकूण 8 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच दि.11.05.2020 रोजी सायं 5.00 वा.जबलपूर (म.प्र.) साठी व रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी रेल्वेगाडया रवाना होत आहेत.