नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या भागात वैद्यकीय महाविद्यालयांनी अतिरीक्त सुविधा उभारून रुग्णांवर तातडीने उपचार करावेत, अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नागपूर, अकोला, यवतमाळ, तसंच जळगाव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची देशमुख यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयात आवश्यक साधनांची तातडीने रीतसर मागणी नोंदवावी, त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन ताबडतोब पुरवठा केला जाईल असं आश्वासनही अमित देशमुख यांनी यावेळी दिलं.