नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची नोंद झाली आहे.

एप्रिल २०१९ च्या तुलनेत यावर्षीच्या एप्रिल महिन्यात अशा घटनांमध्ये ८८ टक्के, तर मे २०१९ च्या तुलनेत यावर्षीच्या मे महिन्यात ८४ टक्के घट झाली असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.