मुंबई : नेहरू विज्ञान केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने 18 मे  2020 रोजी  दोन ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांनी सोमवार 18 मे 2020 रोजी ‘यूट्यूब लाइव्ह’ द्वारा YouTube Channel http://www.youtube.com/c/NSCMumbai वर दोन लॉकडाउन व्याख्यानांचे  आयोजन केले आहे. रॉब किर्क, वाणिज्यिक कामकाज प्रमुख, ग्रँड एक्झीबिशन यांचे “हाउसिंग इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स ऑफ इंडिया” या विषयावरील पहिले व्याख्यान शनिवारी दुपारी 3 वाजता होणार आहे तर “म्युझियम्स फॉर डायव्हर्सिटी , इक्वॅलिटी अँड इन्क्लुजन ” या विषयावर लॉर्ड कल्चरल रिसोर्सेसच्या सह-संस्थापक आणि अध्यक्ष गेल डेक्सटर लॉर्ड यांचे व्याख्यान त्याच दिवशी संध्याकाळी 6  वाजता होणार आहे. नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद एम . खेनेड  यांनी  विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना वर दिलेल्या तपशीलांनुसार आपल्या कार्यालयीन स्थळावरून  किंवा घरून YouTube चॅनेलवर (http://www.youtube.com/c/NSCMumbai) थेट सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.