पिंपरी : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने तसेच घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे व पंकज भालेकर यांनी स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध केला.
कचरा संकलन आणि वहन या कामाचा बोजवारा उडाला आहे. गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचलण्यावरुन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्याने नगरसेवक मयूर कलाटे व पंकज भालेकर यांनी आंदोलन केले.