नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पी.एम. किसान योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या सुमारे २ लाख ३३ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात २ हजार रुपयाचा पहिला हप्ता जमा केल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
स्वयंपाकासाठी इंधन उपलब्ध व्हावं, यासाठी उज्वला गॅस योजनेतून सहा हजार लाभार्थी वगळता सुमारे १ लाख ३१ हजार ३३५ लाभार्थ्यांच्या खात्यात गॅस रिफीलचं अनुदानही जमा केलं आहे असं ते म्हणाले.
विधवा, परितक्त्या तसंच वृध्द व्यक्तींच्या सुमारे १ लाख ६६ हजार खातेधारकांच्या बँक खात्यात जनधन योजने अंतर्गत पाचशे रुपये प्रमाणे पेन्शन जमा केल्यानं त्यांना मदत झाली आहे.