पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर राज्यामधील 86 हजार 590 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 19 मे 2020 अखेर 66 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 29, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 8, हिमाचल प्रदेशसाठी 1 झारखंड साठी 2, छत्तीसगडसाठी 2, जम्मू आणि काश्मिर साठी 1 अशा एकूण 66 रेल्वेगाडया 86 हजार 590 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

19 मे 2020 रोजी अमृतसर येथून सांगली येथे 1 हजार 241 प्रवासी घेऊन रेल्वे प्रस्थान करणार आहे.
तसेच 20 मे 2020 रोजी पुणे विभागातून उत्तरप्रदेशसाठी 4, बिहारसाठी 3 तसेच छत्तीसगडसाठी 1 अशा एकूण 8 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकूण 11 हजार 324 प्रवाशी अपेक्षित आहेत.

यापैकी पुणे स्थानकावरून उत्तरप्रदेशसाठी 3, व छत्तीसगड साठी एक रेल्वे 5 हजार 417 प्रवाशांसह नियोजीत आहे. तर सातारा रेल्वे स्थानकावरुन उत्तरप्रदेशसाठी 1 हजार 456 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजीत आहे. तर सांगली स्थानकावरून बिहारसाठी एक रेल्वे 1 हजार 539 प्रवाशांसह व कोल्हापूर स्थानकांवरुन बिहारसाठी 2 हजार 912 प्रवाश्यांसह 2 रेल्वेगाड्या नियोजित आहेत.

पुणे विभागातून 5 हजार 871 बसद्वारे 76 हजार 294 प्रवासी आपल्या मूळ गावी गेले आहेत. तसेच 289 बसद्वारे 5 हजार 708 प्रवासी पुणे विभागात दाखल झाले आहेत.

या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.