नवी दिल्ली : सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग, कृषी क्षेत्र, किरकोळ व्यापार आणि इतर उद्योगातल्या ५५ लाख खातेधारकांना, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी, या वर्षी एक मार्च ते १५ मे या कालावधीत, सुमारे ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून जास्त कर्ज मंजूर केलं आहे.
केंद्रीय अर्थ विभागानं ही माहिती दिली आहे. यापैकी एक लाख कोटी रुपयांचं कर्ज, २० मार्च ते २५ मे या कालावधीत, आपत्कालीन मदत या आधारावर दिल्याचं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटर संदेशात स्पष्ट केलं आहे. ८ मे नंतर मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेत तर लक्षणीय वाढ झाली आहे,असही त्यांनी नमूद केलं आहे.