नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला असून आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे.

सध्या दररोज एक लाख चाचण्या करण्याची क्षमता असून एका पॉजिटिव्ह अहवालामागे किमान २० नकारात्मक अहवाल मिळत असल्याचं संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

जानेवारीमधे केवळ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत या चाचण्या होत होत्या, आता देशभरात 555 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आरोग्य यंत्रणेमधे एवढी मोठी झेप घेताना भारतीय वैज्ञानिक, तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आणि प्रशासकीय यंत्रणेनंही मोठं आव्हान पेलल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.