नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभर त्यांना अभिवादन केलं जात आहे. १९९१ साली आजच्या दिवशी तमिळनाडूत पेरुम्बुदूर इथं एलटीटीई या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अभिवादन केलं आहे. राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या स्मृती दिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.