नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात होईल. खंडग्रास चंद्रग्रहणाचा परमोच्च बिंदू 3 वाजून 1 मिनिटांनी असेल. या क्षणी चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग पृथ्वीच्या छायेने झाकलेला असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी ग्रहण सुटेल.
संपूर्ण भारतातून सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे ग्रहण दिसेल केवळ अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दूरवरच्या ईशान्येकडच्या भागात ग्रहण सुटतांनाची स्थिती दिसू शकणार नाही.
ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ईशान्य आशिया वगळता आशियाचा इतर भाग, उत्तर स्कँडेव्हिया वगळता युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात ग्रहण दिसेल. ग्रहणाचा एकूण अवधी 2 तास 59 मिनिटे असेल.