नवी दिल्ली : पश्चिम मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील  ४८ तास कायम  राहणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत तो ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीकडे  सरकण्याची शक्यता आहे.  त्यामुळे मच्छिमारांनी येत्या उद्यापासून पुढचे काही दिवस अरबी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा पृथ्वी-विज्ञान मंत्रालयानं दिला आहे.

येत्या ३१ मे ते ४ जून या दरम्यान अरबी समुद्राच्या मध्य आणि आग्नेयेकडच्या भागात  कमी दाबाचा पट्टा  निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे  केरळमध्ये १ जूनला मान्सूनचं  आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज  पृथ्वी-विज्ञान मंत्रालयानं वर्तवला आहे.