मुंबई : जिल्हा नियोजनचा सर्वाधिक निधी ‘कोरोना’ नियंत्रणासाठी प्राधान्याने खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज प्रशासनाला दिले.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर मुंबई जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.शेख म्हणाले की, राज्य सरकार आजच्या घडीला ‘कोरोना’च्या संकटावर नियंत्रण मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य देत आहे. अशा परिस्थितीत कोरोना विरोधात लढणाऱ्या यंत्रणेला सर्व प्रकारच्या सुविधा मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे जिल्हा नियोजन विकास समितीतून उपलब्ध होणारा निधी हा जास्तीत जास्त आरोग्य यंत्रणेवर खर्च करुन आरोग्य यंत्रणेला कोरोना विरोधात लढण्यासाठी अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.