नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत. तर महिला संघ फक्त एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

पुरुष संघाचा पहिला टी ट्वेंटी सामना ११ ऑक्टोबरला होणार आहे, टी ट्वेंटी मालिकेनंतर कसोटी मालिका होईल, तर महिला तसंच पुरुष संघांचे एकदिवसीय सामने पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहेत.