मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक ललिता ताम्हणे यांचं ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६० वर्षाच्या होत्या. वृत्तपत्रांमधे विशेषतः चित्रपटविषयक लिखाण त्यांनी खूप काळ केलं. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचं संपादन त्यांनी केलं होतं.
मी- स्मिता पाटील, नूतन, ”तें’ची प्रिया ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. उजळल्या दाही दिशा, झाले मोकळे आकाश या दोन कादंबऱ्याही ललिता ताम्हणे यांनी लिहिल्या आहेत.