पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेच्या ॲपचे लोकार्पण माझ्या हस्ते आज करण्यात आले. या सुविधेमध्ये नागरिकांमध्ये दिसत असलेल्या ताप, खोकला, थकवा, वेदना इत्यादी लक्षणांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नावली आहे. तसेच संबंधित नागरिकाने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने कुठे कुठे प्रवास केला आहे. इत्यादी माहिती ॲपमध्ये संकलित केली जाते.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. पवन साळवे, डाॅ वर्षा डांगे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
टेलिमेडीसीन सुविधेचा उपयोग करून नागरिक तज्ञ डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकता. तसेच नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून डॉक्टरांची वेळ घेतल्यानंतर त्या वेळेमध्ये नागरिक डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. यामुळे नागरिकांना घरबसल्या योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. तरी या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.