नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्राने परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, याकडे लक्ष द्यावे. तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्य योजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशभरातल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठ संकट सध्या जगावर आले आहे आणि वैद्यकीय क्षेत्राने त्याचा केलेला सामना आणि कोरोना योद्ध्यांचे योगदान कौतुक करण्यासारखे आहे. टेलिमेडिसीन लोकप्रिय करण्यासाठी नवीन मॉडेल विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मेक इन इंडियामार्फत देशांतर्गत वैद्यकीय आरोग्य क्षेत्राचा विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.