नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, आज ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत पीएसयुचा संयुक्त उपक्रम, ऊर्जा कार्यक्षम सेवा मर्यादित (Energy Efficiency Services Limited (ईईएसएल) ने आंतरराष्ट्रीय विकासासाठीच्या अमेरिकी संस्थे (U.S. Agency for International Development’s (युएसएआयडी) सोबत भागीदारीमध्ये मैत्री कार्यक्रमांतर्गत “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम सुरु केला आहे जो कार्यस्थळ अधिक निरोगी आणि पर्यावरण पूरक बनविण्याच्या दिशेने पुढाकार घेणारा एक उपक्रम आहे.
ऊर्जा कार्यक्षमतेसाठी बाजाराचे एकत्रीकरण आणि परिवर्तन कार्यक्रम अर्थात मैत्री (एमएआयटीआरईई), अंतर्गत सुरु केलेला हा उपक्रम ऊर्जा-मंत्रालय आणि युएसएआयडी मधील अमेरिका-भारत द्विपक्षीय भागीदारीचा एक भाग आहे आणि इमारतींमध्ये मानक सराव म्हणून प्रभावी ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करण्यास गती देणे आणि विशेषतः इमारतींमधील वातावरण थंड होण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
“निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रमाचा एक पथदर्शी उपक्रम म्हणून ईईएसएल ने स्वतःच्या इमारतीमध्ये ही रचना अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, “हा उपक्रम विद्यमान इमारती आणि वातानुकून यंत्रणेच्या जुन्या जोडणींच्या (रेट्रोफिटिंग) आव्हानांचे निराकरण करत आहे जेणेकरून दोन्ही निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम राहतील. आम्हाला आशा आहे की हा पथदर्शी उपक्रम इतर इमारतींसाठी निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम होण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा मार्ग खुला करेल. नेहमीप्रमाणे आमचे कार्य हे नागरिकांसाठी आणि प्रत्येकासाठी फायद्याचे आहे आणि युएसएआयडी सोबतची आमची ही भागीदारी हे कार्य अधिक वृद्धिंगत करायला मदत करेल.”
हवेचा निकृष्ट दर्जा ही बऱ्याचकालावधीपासून भारतातील चिंतेची बाब झाली आहे आणि कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर तर हे आधीच महत्वाचे झाले आहे. लोकं त्यांचे कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा जायला सुरुवात करत असताना त्यांचा आराम, हित, उत्पादकता आणि एकंदरीत सार्वजनिक आरोग्यासाठी या सर्व ठिकाणी हवेची गुणवत्ता राखणे फार आवश्यक आहे. बाहेरील हवेचा वाढता दाब, वातानुकूलन यंत्रणेतील अतिरिक्त फिल्टरेशन यासारखे जुने जोडणीचे उपाय हे उपभोगत्यासाठी अधिक खर्चिक आणि उर्जेचा अतिरिक्त वापर करतात. जुन्या जोडणींसाठी कोणताही प्रमाणित दृष्टीकोन नाही.
ईईएसएल कार्यालयातील या पथदर्शी उपक्रमामुळे, संपूर्ण देशभरातील इतर इमारतींमध्ये वापरासाठी वैशिष्ट्ये विकसित करणे त्याचबरोबर, विविध तंत्रज्ञानाचा प्रभावीपणा व खर्च-फायद्यांचे मुल्यांकन करण्यात मदत करणे आणि हवेची गुणवत्ता, आराम आणि ऊर्जा वापराचा अल्प आणि दीर्घकालीन परिणामांचे मुल्यांकन करणे या समस्यांचे निराकरण करेल.
भारतातील यूएसएआयडीचे कार्यवाहक अभियान संचालक रमोना एल हमझाऊई म्हणाले की,“यूएसएआयडीला ईईएसएल बरोबरच्या भागीदारीचा अभिमान आहे. ईईएसएलने नवी दिल्लीतील स्वतःच्या कार्यालयात ही कल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे खरंच प्रेरणादायक आहे. आमच्या भागीदारीवर उभारलेला हा प्रयत्न इमारतींमध्ये हवेची गुणवत्ता आणि उर्जा वापराच्या समस्यांकडे लक्ष देईल – आराम, आरोग्य, उत्पादकता आणि अंततः भारत आणि दक्षिण आशियातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल. ”
कुमार आणि अल हमझाऊई यांनी ट्विटरवर एक संयुक्त व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये हा पथदर्शी उपक्रम कसे कार्य करेल हे समजावून सांगितले आहे आणि ईईएसएल कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी परत आल्यावर कसे सुरक्षित वाटेल हे दाखविले आहे. https://www.youtube.com/watch?v=NfeZjEQKa-c येथे हा व्हिडिओ पाहता येईल.
ईईएसएल विषयी : उर्जा कार्यक्षमता सेवा मर्यादित (ईईएसएल), भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्या आणि देशात जगातील सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्षमता पोर्टफोलिओ कार्यान्वित करण्याच्या दिशेने दिशेने काम करत आहे. अधिक सक्षम करणे- अधिक पारदर्शकता, अधिक परिवर्तन आणि अधिक नवीनता या अभियानाद्वारे चालविलेले, ईईएसएलचे उद्दीष्ट कार्यक्षम आणि भविष्यातील तयार परिवर्तनात्मक उपायासाठी बाजारपेठेत प्रवेश करणे जे प्रत्येक भागधारकासाठी फायद्याची परिस्थिती निर्माण करेल.
युएसएआयडी विषयी: युएसएआयडी ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे.