नवी दिल्ली : मिशन  बिगिन  अगेन  अंतर्गत आजपासून राज्यातल्या अनेक ठिकाणच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या दिसून आली. मुंबईतही वांद्रे कुर्ला संकुल आणि  लोअर परेल, इथली  कार्यालय  सुरु झाली. दादर, कुलाबा आणि कुर्ला इथल्या प्रमुख बाजारपेठांतली दुकानं उघडली आहेत.

आज सकाळी उपनगरातल्या मालाड,मुलुंड आणि शेजारच्या ठाणे शहरांतल्या बस स्थानकांवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. सामाजिक अंतर पाळून बस सेवा सुरु आहे. दुपारपर्यंत बेस्टच्या एकवीसशे बसेस शहरातल्या रस्त्यांवर धावणार असल्याचं बेस्टनं आज जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. एसटीनं देखील मुंबई आणि परिसरात सुमारे २५० गाड्यांनी कर्मचाऱ्यांची वाहतूक केली. कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांनामुळे इतके दिवस मोकळे असलेल्या रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोडींही झाली.

दरम्यान, राज्यातली प्रार्थनास्थळं, मॉल, शाळा, महाविद्यालयं अद्याप बंद आहेत.