पुणे : येथील मानवतावादी समाजसंवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला.

मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या सदस्यांमार्फत अनाथाश्रम, वृध्दाश्रम, अंध व्यक्तींच्या संस्था यांना आर्थिक मदत करण्यात येते. या संघटनेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

सध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थीमध्ये मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या संघटनेमार्फत आज रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार ) चा धनादेश ‘मुख्यमंत्री सहायता निधीस’ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नायब तहसिलदार श्रावण ताते यांच्याकडे जमा करण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गफ्फार खान,सचिव अशोक जाधव, उपाध्यक्ष प्रकाश रावळकर, अरविंद पिल्ले, श्रीनिवास नंबियार तसेच सदस्य एम.के. भंडारी इ.उपस्थित होते.