नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी आता खाजगी उद्योगांना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आघाडी सरकारनं दुस-या कार्यकाळातलं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानिमित्त ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत अंतराळ क्षेत्रात खाजगी उद्योगांना प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

गगनयान या अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीरांचं प्रशिक्षण रशियात सुरु असून कोविड-19 च्या साथीमुळं त्यात खंड पडला आहे, असं ते म्हणाले. तरुण वैज्ञानिकांसाठी इस्रोनं सुरु केलेल्या युविका कार्यक्रमाची माहिती त्यांनी दिली.