नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आता “कमकुवत” देश राहिला नसून भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे. राष्ट्रीय  सुरक्षेबाबत आपण  कधीही तडजोड करणार नाही,असं आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते जम्मू-काश्मीरच्या ‘जनसंवाद’ रॅलीत बोलत होते.

चीनने भारताशी असलेला वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची इच्छा व्यक्त केली असून, भारत सरकारचं ही असंच  मत आहे. लडाख सीमेवर चीनशी झालेल्या संघर्षांच्या संदर्भात त्यांनी हे विधान केलं.

केंद्र सरकार संसदेत किंवा सीमेवरील घडामोडींबद्दल कोणालाही  अंधारात ठेवणार नाही आणि योग्य वेळी तपशील सामायिक करेल, असंही त्यांनी यावेळी विरोधी पक्षांना संबोधून आश्वासन दिलं.