नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली. अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे. या औषधामुळं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा विभागानं केला आहे.

यामुळं वेंटिलेटर वर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण ३५ टक्क्यांनी तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूंचं प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र गंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांना याचा लाभ होत नाही, असं संशोधनात स्पष्ट झालं आहे.