नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना पुढचे १२५ दिवस मिशन मोडवर चालवली जाणार आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमधल्या ११६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल. याअंतर्गत विविध २५ प्रकारच्या रोजगारातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा विकास होणं अपेक्षित आहे.