नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाअखेरपर्यंत कोविड-१९ वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

सुमारे १० जणांवर याच्या यशस्वी चाचण्या सुरु असून यातल्या तिघांनी तर चाचणीच्या तिसऱ्या आव्हानात्मक टप्प्यात यशस्वीरित्या प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षाअखेरपर्यंत सुमारे दोन अब्ज एवढी कोविड-१९ लसींची मात्रा उपलब्ध होऊन ती गरजू रुग्णांसाठी वापरता येऊ शकेल अशी आशा स्वामिनाथन यांनी व्यक्त केली आहे.